महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर वीज केंद्रात 8 दिवस पुरेल इतकाच कोळसा, विजेचे संकट देशभरात - उर्जाराज्यमंत्री तनपुरे - वीज केंद्र चंद्रपूर प्राजक्त तानपुरे भेट

राज्यातील वीज केंद्रात जवळपास एक किंवा दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. त्या तुलनेत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ( Prajakt Tanpure on Chandrapur Coal Power Station) परिस्थिती तशी बरी आहे. सातही संच सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा स्टॅाक शिल्लक आहे, अशी माहिती ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

prajakt Tanpure comment on Chandrapur Coal Power Station
वीज केंद्र चंद्रपूर कोळसा साठा प्राजक्त तानपुरे माहिती

By

Published : Apr 14, 2022, 8:52 AM IST

चंद्रपूर - राज्यातील वीज केंद्रात जवळपास एक किंवा दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. त्या तुलनेत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ( Prajakt Tanpure on Chandrapur Coal Power Station) परिस्थिती तशी बरी आहे. सातही संच सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा स्टॅाक शिल्लक आहे. या दिवसांत पावसाळ्यात दोन महिने पुरेल इतका कोळशाचा स्टॅाक करायचा असतो. मात्र, टंचाई असल्याने तो एवढाच आहे. मात्र, ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नसून संपूर्ण देशातील अनेक राज्यांत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने यात लक्ष देऊन राज्यांना अधिकाधिक कोळशाचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा -Leopard Cub Attacked Woman : घरातील खाटेखाली लपून बसले होते बिबट्याचे पिल्लू.. पाहताच केला हल्ला.. अन् झालं 'असं'

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला ( Power Station visit Chandrapur Prajakt Tanpure ) भेट दिली. या भेटीत त्यांनी कोळसा टंचाई आणि वीजपुरवठ्याची माहिती जाणून घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तनपुरे म्हणाले की, कोरोना काळात मोठे उद्योग, छोटी - मोठी दुकाने बंद होती. आता कोरोनाची लाट ओसरली. त्यामुळे, सगळे उद्योग आता पूर्णक्षमतेने सुरू झाले आहे. यामुळे यावर्षी विजेची मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली आहे. जवळपास आठ ते दहा टक्के त्यात वाढ झाली. अशी परिस्थिती असली तरी ज्यांच्यासोबत महावितरण कंपनीचे करार आहेत. त्याशिवाय ज्यांच्याशी करार नाही, त्यांच्याकडून एक्सचेंजधून वाढीव दराने वीज कशी खरेदी करता येईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजरातमधील एका कंपनीकडून ७०० मेगावॅट वीज घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी महावितरण कंपनीचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, असेही तनपुरे यांनी यावेळी सांगितले.

आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात येथे सध्या भारनियमन सुरू आहे. मात्र, त्या तुलनेत आपल्याकडे भारनियमन कमी आहे. लोकांना या संकटापासून कसे वाचविता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा. २०२० मध्ये शेतकऱ्यांची मागील थकबाकीची जवळपास ६० ते ७० टक्के रक्कम माफ केली. उर्वरित ३० टक्के रक्कम वर्षभरात भरायचे अशी योजना महावितरण कंपनीने थकबाकीसाठी आणली. अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. या तीन महिन्यांत आपण शेतकऱ्यांकडून थकीत बिलाचे पैसे वसूल करणार नाही. पैसे येतील तेव्हा शेतकरी पैसे भरतील. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला दुर्गापूर कोळशा खाणीतून कोळशाचा पुरवठा होतो. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ही खाण तीन-चार महिने बंद राहणार असल्याची माहिती वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे, या खाणीतून मिळणारा सहा हजार टन कोळसा मिळणार नाही. त्यामुळे, पर्याय शोधावा लागेल, असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, हिराचंद बोरकुटे, मुनाज शेख यांची उपस्थिती होती.

नाव न घेता राज ठाकरेंना टोला -मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर नाव न घेता उर्जाराज्यमंत्री तनपुरे यांनी टीका केली. त्यांचा मुद्दा बरोबर की चूक, यावर आपण भाष्य करणार नाही. मात्र, सध्या देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या भावाने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गॅसच्या दरवाढीने सामान्यांचा बजेट कोलमडला आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्राचे कान टोचणे आवश्यक आहे. मात्र, मागणी नसलेल्या मुद्द्यांना एका राजकीय पक्षाचे प्रमुख हात घालत असल्याची टीका त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता यावेळी केली.

हेही वाचा -हत्येचे गूढ उकलले.. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीचा निर्घूण खून.. असा रचला कट

ABOUT THE AUTHOR

...view details