महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेड इन चंद्रपूर.. मेडी-रोवर रोबोट करणार कोरोना रुग्णांची सेवा - कोरोना विषाणू

मेडी-रोवर रोबोटचा वापर केल्यामुळे कोरोना रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यातील संपर्क कमी होण्यास मदत होणार आहे. या रोबोटची निर्मिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोगशाळेत टाटा टेक्नॉलॉजीतर्फे तयार करण्यात आला.

robot serve patient  in hospital
रोबोट करणार चंद्रपुरातील रुग्णांची सेवा

By

Published : May 9, 2020, 10:22 AM IST

Updated : May 9, 2020, 12:33 PM IST

चंद्रपूर- कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने जिल्ह्यात बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट शनिवारपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला.

डॉ.कुणाल खेमनार,जिल्हाधिकारी , चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता मेडी-रोवर नामक रोबोट कोरोना रुग्णांची‌ सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे. मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा कमीत कमी संपर्क यावा हा आहे

टाटा टेक्नॉलॉजीचे प्रकल्प संचालक मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.

असा करतो मेडी-रोवर काम

मेडी-रोवर हा रोबोट वायरलेस असून बॅटरी द्वारा संचालित आहे. हा रोबोट 30 किलो इतके वजन वाहून नेऊ शकतो. या रोबोटला 10 मीटरपर्यंत संचालित करता येऊ शकते. तसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे साहित्य, औषधे, उपयुक्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे. हा रोबोट हाताळायला अत्यंत सोपा आहे.

Last Updated : May 9, 2020, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details