चंद्रपूर -राज्यासह देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक नागरिक आपल्या परीने प्रयत्न करत आहे. त्यात आता भिक्षू संघही पुढे आला आहे. संघराम गिरी येथील भिक्षुसंघाच्या वतीने शनिवारी ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनात पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले.
संघरामगिरी भिक्षूसंघातर्फे पोलिसांना मास्क वाटप - news about corona virus
राज्यातील पोलीस जीवाचे रान करून कोरोना विरुद्ध लढत आहेत. त्यांना भिक्षुसंघाच्या वतीनी शनिवारी मास्कचे वाटप करण्यात आले.
आजच्या परिस्थितीत सारा देश कोरोनाशी झुंज देत आहे. या युद्धात प्रमुख वाटा आहे, आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस विभागाचा. पोलीस जीवाचे रान करून कोरोना विरुद्ध लढत आहेत. यामुळेच भिख्खू संघ संघारामगिरी (रामदिगी) यांनी अनोखे कार्य केले. जिल्ह्यातील वरोरा शेगांव (बु) या पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वताची काळजी घ्या, लोकांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करावे असा संदेश दिला.
या प्रसंगी भन्ते धम्मचेती,भन्ते प्रबुद्धांनंद, भन्ते अग्गज्योती, भन्ते रुपज्योती, दिनेश पाटील, संघरत्न गुघे,अतुल धाबाडे, मगेश चौके, सूरज शिडामे,राकेश कडवे आंदी उपस्थित होते.