महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, मोहफूल वेचण्यासाठी गेला होता जंगलात

मूल तालुक्यातील गावालगतच्या जंगलात मोह वेचण्यासाठी गेलेला गुलाब निकुरे (४७) यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना कवळपेठ येथे घडली.

tiger
tiger

By

Published : Apr 11, 2020, 2:45 PM IST

चंद्रपूर - मूल तालुक्यातील गावालगतच्या जंगलात मोह वेचण्यासाठी गेलेला गुलाब निकुरे (४७) यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना कवळपेठ येथे घडली. नेहमीप्रमाणे सकाळी गुलाब निकुरे हे गावकऱ्यांसोबत गावालगतच्या वनपरीक्षेञ चिचपल्ली हद्दीतील कक्ष क्र. ५१७ येथे मोह वेचण्यासाठी गेले होता.

जंगलातल्या वेगवेगळ्या झाडाखाली गावातील मंडळी मोह वेचत होते. दरम्यान, गुलाब निकुरे पुतण्या अंकुश निकुरेसोबत मोह वेचत होता. यावेळी झाडाजवळच्या झुडपात दडून बसलेल्या पट्टेदार वाघाने गुलाब निकुरे यांच्यावर हल्ला केला. काका गुलाबवर वाघाने हल्ला करून ओढत नेऊ लागताच पुतण्या अंकुशने काकाला वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली. अंकुशच्या ओरडण्याने आजुबाजुला मोह वेचत असलेली मंडळी आरडू लागली. त्यावेळी काही दूर अंतरावर फरफटत नेलेल्या गुलाबला यांना सोडून वाघ पसार झाला.

पाठलाग करणारी मंडळी घटनास्थळी पोहोचले तेव्हा गुलाबचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती स्थानिक वनाधिकाऱ्यांना होताच वनपरिक्षेञ अधिकारी वैभव राजुरकर, क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके आणि वन्यप्रेमी उमेशसिंह झिरे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली व मृत गुलाबाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मूल येथे रवाना केले. दरम्यान, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड यांनीही भेट देवून मृत गुलाब निकुरे यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन करून वनविभागाकडून आर्थिक सहकार्याचे आश्वासन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details