महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएम आणि मतदानाची प्रक्रिया पारदर्शी करा; वंचित बहुजन आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

११ एप्रिलपासून ते २३ मे म्हणजे मतमोजणी दिवशीच्या सकाळपर्यंत स्ट्राँग रूम आणि परिसराचे सीसीटीव्हीचे अखंड फुटेज उपलब्ध करून द्यावेत, पोस्टल मतदानाची प्रक्रिया पारदर्शी नाही. यात किती जणांनी मतदान केले त्याची नोंदणीदेखील होत नाही

ईव्हीएम आणि मतदानाची प्रक्रिया पारदर्शी करा

By

Published : Apr 16, 2019, 9:24 AM IST

चंद्रपूर - ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीची प्रक्रिया याबाबत मतदारांमध्ये संशयाचे वातावरण आहे. ही प्रक्रिया पारदर्शी व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी दिले. डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे, बंडू नगराळे, शकील शेख उपस्थित होते.

ईव्हीएम आणि मतदानाची प्रक्रिया पारदर्शी करा

११ एप्रिलपासून ते २३ मे म्हणजे मतमोजणी दिवशीच्या सकाळपर्यंत स्ट्राँग रूम आणि परिसराचे सीसीटीव्हीचे अखंड फुटेज उपलब्ध करून द्यावेत, पोस्टल मतदानाची प्रक्रिया पारदर्शी नाही. यात किती जणांनी मतदान केले त्याची नोंदणीदेखील होत नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी किती कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले ती संख्या जाहीर करून ईव्हीएमची मतगणना करण्यापूर्वी पोस्टल बॅलेटची मतगणना करण्यात यावी. ज्या ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड आला त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, मतगणना केंद्राच्या ५०० मीटर परिसरात ब्लुटुथ, मोबाईल, इंटरनेट जामर लावण्यात यावे, सीसीटीव्हीचे अखंड फुटेज ऑनलाईन आयपी अड्रेसद्वारा सर्व उमेदवाराला देण्यात यावे, कंट्रोल युनिटच्या मदरबोर्डमध्ये कुठल्याही प्रकारची सेटिंग नाही हे मतमोजणीनंतर त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details