महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबीजचे कर्मचारी 9 डिसेंबरपासून बेमुदत संपावर; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी - latest news of chandrapur

गेल्या अनेक महिन्यांपासून महाबीजचे अधिकारी-कर्मचारी हे सातत्याने याबाबतचा पाठपुरावा करत आहेत. मात्र, अजूनही त्यांना याचा लाभ मिळू शकला नाही. अखेर महाबीजच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

महाबीज बहुजन कर्मचारी संघटना
महाबीज बहुजन कर्मचारी संघटना

By

Published : Dec 5, 2020, 8:28 PM IST

चंद्रपूर -सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी 9 डिसेंबरपासून महाबीजचे कर्मचारी राज्यस्तरीय बेमुदत संपावर जाणार आहेत. अंमलबजावणीची संपूर्ण प्रक्रिया होऊनही वित्त विभागाने अजूनही कृषी मंत्रालयात फाईल पाठवली नाही. त्यामुळे याबाबतचा शासन निर्णय अद्यापही लागू झाला नाही, अशी माहिती महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वित्त मंत्रालयाकडून महाबीजची फाईल कृषी विभागाकडे आलीच नाही-

महाराष्ट्र शासनाच्या 30 जानेवारी 2019 अधिसूचनेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. महाबीज हे स्वायत्त महामंडळ असल्याने महाबीजने सातव्या वेतन आयोगाची आर्थिक तरतूद केली आहे. सातवे वेतन लागू झाल्यास याबाबतचा कुठलाही आर्थिक भुर्दंड शासनाच्या तिजोरीवर पडणार नाही. त्यामुळे या महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव महाबीज महामंडळाचे अध्यक्ष तसेच कृषी मंत्रालयाचे सचिव यांच्यामार्फत वित्त विभाग विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाने देखील याला मान्यता दिलेली आहे. परंतू वित्त मंत्रालयाकडून महाबीजची फाईल अजूनही कृषी विभागाकडे आली नाही, त्यामुळे याबाबतचा शासन निर्णय घोषित होऊ शकला नाही.

महाबीज बहुजन कर्मचारी संघटना

राज्यभरात कामबंद आंदोलन -

गेल्या अनेक महिन्यांपासून महाबीजचे अधिकारी-कर्मचारी हे सातत्याने याबाबतचा पाठपुरावा करत आहेत. मात्र, अजूनही त्यांना याचा लाभ मिळू शकला नाही. अखेर महाबीजच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच येत्या 9 डिसेंबरपासून महाबीजचे कर्मचारी संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन करणार आहेत. याचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसण्याची दाट शक्यता आहे.

शासनाने त्वरित दखल घ्यावी -

सद्यस्थितीत खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन धान व इतर पिकांची आवक बीज प्रक्रिया केंद्रावर सुरू आहे. तसेच रब्बी हंगामाच्या बीजोत्पादनाची कामे सुरू आहेत. तसेच धान, गहु, हरभऱ्याची पेरणी सुरू आहे. त्यामुळे या संपाचा चालू हंगामातील शेतकऱ्यांवर व भविष्यात होणाऱ्या खरीप व रब्बी हंगामात बियाण्याच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होईल. शासनाने याची त्वरित दखल घेऊन महाबीजच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, अशी मागणी महाबीजच्या बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेने केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संघटनेचे सचिव प्रशांत गजभिये, महिला संघटक कविता पाटील, अजय फुलझेले यांची उपस्थिती होती.

हेही वाचा-तोपर्यंत नव्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही; नितेश राणेंचा इशारा

हेही वाचा-महापरिनिर्वाण दिन - ‘कोविड–१९’च्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर 'पॅगोडा' बंद

ABOUT THE AUTHOR

...view details