चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात एका कामगाराला वाघाने उचलून नेल्याच्या घटना नुकतीच घडली होती. त्यातच आता याच परिसरालगत एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली ( Leopard Killed Boy in Chandrapur ) आहे. दुर्गापूर नेरी परिसरातील हा मुलगा असून त्याचे नाव राज भडके असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे.
नुकतीच घडली आहे एक घटना -
बुधवारी रात्री चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार घरी परतत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला करीत उचलून नेले होते. आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच याच वनपरिक्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर परिसरात एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली आहे.