महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वन्यजीवांच्या मृत्यूचे सत्र सुरूच, आणखी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला - रेंगातोडी बिट

नागभीड वनपरिक्षेत्र येथील रेंगातोडी बिटमध्ये एक नर बिबट मृतावस्थेत आढळला. हा एक तरुण बिबट होता. तसेच त्याच्या शरीराचे सर्व भाग शाबूत आहेत.

nagbhid, leopard
आणखी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला

By

Published : Feb 3, 2020, 4:02 PM IST

चंद्रपूर - आयुध निर्माणी परिसरात एकाच वेळी दोन बिबट आणि दोन अस्वलांचा विजेचा करंट लागून दुर्दवी मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली.

नागभीड वनपरिक्षेत्र येथील रेंगातोडी बिटमध्ये एक नर बिबट मृतावस्थेत आढळला. हा एक तरुण बिबट होता. तसेच त्याच्या शरीराचे सर्व भाग शाबूत आहेत. असे असताना हा बिबट्या मृत्युमुखी कसा पडला याचा शोध वनविभाग घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details