महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भक्तीचा अद्दभुत सोहळा, कोंडय्या महाराजांच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली - Kondayaya Maharaj Yatra Festival

चंद्रपूर जिल्ह्यात संतनगरी असी ओळख असलेल्या धाबा गावात भक्तीचा अद्दभूत सोहळा रंगला. या यात्रा महोत्सवा निमित्त पालखी मिरवणूकीत पन्नस भजन मंडळाचा भक्तीमय सुरात भक्त तल्लीन झाले.

kondaya-maharajs-yatra-was-celebrated-in-chandrapur
भक्तीचा अद्दभुत सोहळा, कोंडय्या महाराजांचा जयघोषाने संतनगरी दूमदूमली

By

Published : Jan 24, 2020, 12:54 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात भक्तीचा अद्दभूत सोहळा आज रंगला. यात्रा महोत्सवानिमित्ताने निघालेल्या पालखी मिरवणूकीत पन्नास भजन मंडळाचा भक्तीमय सूरात भक्त तल्लीन झाले. ताळ मृंदग, ढोलकीच्या तालावर भक्त नाचू लागले. पालखीच्या स्वागतासाठी सडा शिंपला गेला, रांगोळीने रस्ते सजवण्यात आले. भक्तीच्या या विविध रंगात अवघे बुडाले होते. कोंडय्या महाराजांचा जयघोषाने संतनगरी दूमदूमली होती. "अवघे गाव झाले पंढरपूर " याची प्रचिती संतनगरीत येत होती.

भक्तीचा अद्दभुत सोहळा, कोंडय्या महाराजांचा जयघोषाने संतनगरी दूमदूमली

संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला गुरुवार पासून सूरवात झाली आहे. पहाटेला गावातील विविध महीला बचत गटाकडून ग्रामसफाई राबवण्यात आली. त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, वैष्णवी बोडलावार यांच्या हस्ते महासमाधीची विधिवत महापूजा धर्मसेवक शेगमवार महाराज यांनी केली. मंदिर परिसरातून पन्नास भजन मंडळाचा भक्तीमय सूरात पालखी मिरवणूक निघाली. हजारो भक्तांनी पालखीत सहभाग घेतला. महीलांनी गावातील मार्गावर सडा टाकून सूशोभित रांगोळया काढल्या होत्या. भजनाचा तालावर दंग झालेले भक्त भान हरवून नाचू लागले होते. गावातील प्रमुख मार्गानी पालखी फिरविण्यात आली. पालखीत सहभाग झालेल्या भक्तांना प्रत्येक वार्डमधील भक्तांनी अल्पोहाराची व्यवस्था केली होती. पाचच्या दरम्यान मंदिर परिसरात पालखीचे विसर्जन करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती, स्वप्नील अनमुलवार, रोषणी अनमुलवार, वंदना अगस्ती, बाबूराव बोमकंटीवार, कांचन गरपल्लीवार, मनोज कोप्पावार उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details