चंद्रपूर- 'तुम्ही भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांना पुन्हा एकदा निवडून द्या, चंद्रपूरच्या विकासासाठी 500 कोटींचा विशेष निधी देण्याचा शब्द मी देतो,' असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. यावर नुकतेच निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जर भाजपचा उमेदवार निवडून येणे हाच जर निकष असेल मागील 25 वर्षे चंद्रपूर विधानसभेवर भाजपची सत्ता होती. त्यानुसार चंद्रपूरच्या विकासासाठी अडीच हजार कोटी जमा करायला हवे होते. त्या पैशाचा वापर मनमानी पद्धतीने नव्हे तर जनतेला विचारून करायला हवा, असे जोरगेवार यावेळी म्हणाले.
पैशाचा वापर मनमानी पद्धतीने नव्हे तर जनतेला विचारुन करायला हवा - किशोर जोरगेवार - महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ लाइव
अपक्ष लढलेले किशोर जोरगेवार यांनी इतिहास घडविला. त्यांनी सलग दोनवेळा निवडून आलेले भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांना तब्बल 71 हजार मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत नाना शामकुळे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते.
हेही वाचा-यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल
अपक्ष लढलेले किशोर जोरगेवार यांनी इतिहास घडविला. त्यांनी सलग दोनवेळा निवडून आलेले भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांना तब्बल 71 हजार मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत नाना शामकुळे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. भाजपची सातत्याने सत्ता असताना जनतेच्या साध्या मूलभूत गरजा देखील भाजप पूर्ण करू शकले नाही. रस्ते, पाणी, रोजगार आदी विषयांकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले. जनतेने दिलेला कौल हे तेच सांगत आहे. आपण आता चंद्रपूर शहराला 200 युनिट वीज मोफत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले.