महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परराज्यातील तरुणाला चोरांनी लुटले; जनविकास सेनेने दिला मदतीचा हात - जनविकास सेनेचे कार्यकर्ते

छत्तीसगड राज्यातून एक युवक रोजगाराच्या शोधासाठी रेल्वेने नागपूरला निघाला. मात्र, चुकीने अर्ध्या रात्री चंद्रपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. अचानक एका नवीन शहरात आलेल्या परराज्यातील या तरुणाला गांजाची नशा करणाऱ्या चोरांनी हेरले. त्या तरूणाला मारहाण केली, त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले व त्याच्या जवळचे दोन हजार रूपये आणि मोबाईल हिसकावला. अनोळखी शहरांमध्ये अर्ध्या रात्री अचानक झालेल्या प्रसंगाने या युवकाला धक्का बसला. या युवकाच्या मदतीला जनविकास सेनेचे कार्यकर्ते धावून आले आणि त्याची मदत केली.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jan 23, 2022, 7:13 PM IST

चंद्रपूर - छत्तीसगड राज्यातून एक युवक रोजगाराच्या शोधासाठी रेल्वेने नागपूरला निघाला. मात्र, चुकीने अर्ध्या रात्री चंद्रपूर रेल्वेस्थानकावर ( Chandrapur Railway Station ) पोहोचला. अचानक एका नवीन शहरात आलेल्या परराज्यातील या तरुणाला गांजाची नशा करणाऱ्या चोरांनी हेरले. त्या तरूणाला मारहाण केली, त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले व त्याच्या जवळचे दोन हजार रूपये आणि मोबाईल हिसकावला ( Person Who Was Robbed by Thieves ). अनोळखी शहरांमध्ये अर्ध्या रात्री अचानक झालेल्या प्रसंगाने या युवकाला धक्का बसला. या युवकाच्या मदतीला जनविकास सेनेचे कार्यकर्ते ( Janvikas Sena activist ) धावून आले आणि त्याची मदत केली.

छत्तीसगडच्या आटरा ( जि. राजनांदगाव) येथील कैलासराम यादव नावाचा 29 वर्षीय बेरोजगार युवक घरी पत्नी व मुलाला सांगून 18 जानेवारी रोजी रेल्वेने रोजगारासाठी नागपूरला मामाकडे जायला निघाला व चुकून अर्ध्या रात्री चंद्रपूर रेल्वे स्थानकात उतरला. रेल्वे रुळावरुन रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या बाजूला जाण्याच्या प्रयत्नात असताना नशा करणाऱ्या चोरट्यांनी या युवकाला मारहाण करून लुटले. त्याच्या अंगावरील पॅन्ट आणि शर्टसुध्दा काढून घेतले. अचानक झालेल्या घटनेने भेदरलेला हा युवक अर्धनग्नावस्थेत सकाळी रेल्वेप रुळाच्या मार्गाने जनता कॉलेज चौकात पोहोचला. जनता कॉलेज चौकातील रिक्षा चालकांनी विचारपूस केल्यानंतर या युवकाने त्यांना आपबिती सांगितली.

ऑटोचालक रमेश गोमासे, सुरेश टापरे, रवी डाहुले, सुरेश कुळसंगे, सुनिल आवळे व योगेश घुगुल यांनी या पीडित युवकाला तात्पुरते अंगावर घालण्यासाठी जुने कपडे देऊन ही बाब वडगाव प्रभागाचे नगरसेवक तसेच जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना कळविली. त्यानंतर त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पीडित व्यक्तीला डॉक्टराकडे नेत त्याच्यावर उपचार केले. त्याला नवीन कपडे भेट दिले. दरम्यान, देशमुख यांनी छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत कांतेश्वर थोटे या आपल्या परिचित व्यक्तीकडून पीडित युवकाच्या गावाची माहिती घेतली व स्थानिक आमदारांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा क्षेत्राच्या स्थानिक आमदार छन्नी चंदू साहू यांच्याशी नगरसेवक देशमुख यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. थोड्यावेळात आमदार साहू यांनी या युवकाने दिलेली माहिती योग्य असल्याचे देशमुख यांना कळविले. त्यानंतर जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी या पीडित युवकाची 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या एर्नाकुलम-बिलासपूर एक्प्रेसची स्वखर्चाने तिकिट काढून सन्मानपूर्वक त्याची स्वगावी रवानगी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details