चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 188 प्रकल्पग्रस्तांपैकी तब्बल 100 जण हे बोगस (Project affected recruitment scam Chandrapur) असल्याचे पडताळणीअंती समोर आले. सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे (Social activist Baliraj Dhote) यांच्यामुळे हा घोटाळा उघडकीस (Chandrapur power station project affected recruitment scam) आला. ही आकडेवारी केवळ एक वर्षाची आहे; मात्र हा घोटाळा मोठा असून 2015 पासून तब्बल 595 प्रकल्पग्रस्तांची भरती वीज केंद्रात करण्यात आली आहे. याची न्यायालयीन चौकशी (Project affected recruitment scam judicial inquiry) करण्याचा निर्धार धोटे यांनी केला आहे. यात मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या घोटाळ्यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत.
बोगस प्रकल्पग्रस्तांचे भरती रॅकेट -चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणूज नोकरी दिली जाते. मात्र, येथे बोगस प्रकल्पग्रस्तांना नोकरी लावून देण्याचे एक रॅकेटच तयार झाले. यामध्ये वीज केंद्रातील काही बडे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी यांचा समावेश आहे. काही बोगस प्रकल्पग्रस्तांना हाताशी धरून गावागावात कुणाला नोकरी हवी याचा शोध घेतला जायचा. हेच बोगस प्रकल्पग्रस्त नंतर दुसऱ्यांना आपल्याला पैसे देऊन कशी नोकरी लागली हे पटवून सांगायचे. त्यानुसार 15 ते 20 लाखांपर्यंत त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे आणि रॅकेटमधील अधिकारी, कर्मचारी दर्जाप्रमाणे पैसे वाटप व्हायचे. 2008 पासून हे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेकडो हजारो बोगस प्रकल्पग्रस्तांची भरती होण्याची दाट शक्यता आहे.
बळीराज धोटेंनी केला पर्दाफाश -मार्च 2021 मध्ये 60 प्रकल्पग्रस्तांची यादी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने जाहीर केली होती. यात ज्यांच्या या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही अशांची देखील नावे यात समोर आली होती. सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी यावर आक्षेप घेत केंद्राच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. याच पद्धतीने नोव्हेंबर 2021 मध्ये 128 जणांची यादी जाहीर करण्यात आली. यातही असाच घोळ होता. धोटे यांनी याबाबत पाठपुरावा करीत यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावर वीज केंद्रातील मानव संसाधन विभागातील उपमहाव्यवस्थापक वानखेडे यांनी धोटे यांच्या विरोधात तब्बल 25 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. मात्र, धोटे याला जुमानले नाही आणि अखेर या घोटाळ्याचे सत्य समोर आले. पहिल्या यादीतील 60 पैकी 25 आणि दुसऱ्या यादीतील 128 पैकी 75 प्रकल्पग्रस्तांची पडताळणी केली असता तब्बल 100 लोक हे बोगस प्रकल्पग्रस्त असल्याचे समोर आले.