चंद्रपूर -जिल्ह्यात एकमेव पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील 73 नागरिकांची सूची तयार करण्यात आली आहे. यापैकी 57 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यापैकी 37 अहवाल निगेटिव्ह आहेत. अद्याप 20 नागरिकांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.
त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा 73 जणांशी संपर्क; 57 जणांची तपासणी - news about corona virus
जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून या रुग्णाच्या सपर्कात ७३ जण आले आहेत. त्यापैकी ५७ नागरिकांचे नमुने तपासण्यात आले आहेत.
चंद्रपूर महानगरात आढळून आलेल्या या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबीयातील सगळे म्हणजे मुलगा, मुलगी व पत्नी तिघेही निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण ज्याठिकाणी रात्रपाळीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता, त्या अर्पाटमेंटच्या सर्व 30 नागरिकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नागपूर कोरोना प्रयोग शाळेत तपासणीसाठी गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 57 पैकी 37 नमुने निगेटिव्ह आले आहेत. अन्य 20 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची 14 व 15 मे ला स्वॅबची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकूण घेण्यात आलेल्या 177 नमुन्यांपैकी 153 नमुने निगेटिव्ह आले आहे. 23 नमुने प्रतीक्षेत असून 1 रुग्ण फक्त पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती, राठोड यांनी दिली आहे.