चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असे दिसून येत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 436 जणांना कोरोना मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर 3 हजार 148 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात नव्याने 141 बाधितांची नोंद झाली असून एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 171, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात 24 तासात आढळलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 70, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर तालुक्यातील 11, मुल तालुक्यातील 13, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील पाच, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील तीन, वरोरा तालुक्यातील एक,भद्रावती, सावली, सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येकी सहा, राजुरा तालुक्यातील दोन, गडचिरोली दोन, वर्धा व तेलंगणा येथील प्रत्येकी एक अशा एकूण 141 जणांचा समावेश आहे.
शहर व परिसरात 'या' ठिकाणी आढळले बाधित - चंद्रपूर शहर व परिसरातील निर्माण समिती परिसर, बालाजी वार्ड, बापट नगर, बाबुपेठ, शांतीनगर जुनोना चौक, पठाणपुरा वार्ड, घुटकाळा वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, नगीनाबाग, इंदिरानगर, दादमहल वार्ड, आंबेडकर नगर, अंचलेश्वर वार्ड, कृष्णा नगर, जवाहर नगर, भिवापुर, लक्ष्मी नगर, रहमत नगर, शक्तिनगर, घुग्घुस, सुंदर नगर भागात बधितांची नोंद करण्यात आली आहे.