चंद्रपूर- राजुरा तालुक्यातील धानोरा येथे वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची घटना घडली. संतोष खमोनकर असे मृत गुराखीचे नाव आहे. राजुरा तालुक्यात वाघ-मानव संघर्ष दिवसेगणिक अधिक तीव्र होत चालला आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही चौथी घटना असून यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
राजुरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
धानोरा येथील संतोष खमोनकार हे नेहमीप्रमाणे गुरे चारायला वनविभागाच्या कक्ष क्र.१३७ मध्ये गेले होते. गुरे चारत असतानाच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खमोनकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
राजुरा तालुक्यात मागिल काही महिन्यांपासून वाघाचा धुमाकूळ सूरू आहे. राजुरा शहरातील इंदिरा नगर येथे वाघाच्या हल्यात व्यक्ती ठार झाल्याचा घटनेला आठवडा उलटला नसताना तालुक्यातील धानोरा येथे वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना घडली आहे. धानोरा येथील संतोष खमोनकार हे नेहमीप्रमाणे गुरे चारायला वनविभागाच्या कक्ष क्र.१३७ मध्ये गेले होते. गुरे चारत असतानाच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खमनोकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.