महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाची हजेरी

दोन दिवसापुर्वी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्यातील धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज (रविवारी) दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे धानपिक व कपाशीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे.

चंद्रपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाची हजेरी

By

Published : Oct 20, 2019, 9:41 PM IST

चंद्रपुर - राज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच जोरदार पाऊस पडत असल्याने मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, कोरपणा तालूक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. धान, कपाशी या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहेत.

हेही वाचा -महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्यातील धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज (रविवारी) दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे धानपिक व कपाशीचे मोठे
नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे.

हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details