चंद्रपूर-जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पुयारदंड या गावातील २७ वर्षीय युवकाचा गळफास लावलेला मृतदेह आढळला आहे. विनोद माणिक पाटील असे तरुणाचे नाव आहे.
चंद्रपूर: तरुणाचा गळफास लावलेला मृतदेह आढळला... मृत्यूचे कारण अस्पष्ट - chandrapur police
दोन दिवसाअगोदर एका मोटारपंप चोरीच्या आरोपातील ३ संशयित चोरांच्या शोधात भिसी पोलीस होते. यातील विनोद हा एक संशयीत आरोपी होता. मात्र, मंगळवारी सकाळच्या सुमारास विनोद माणिक पाटील याच मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
विनोद हा अवैध दारू विक्रीमध्ये सहभागी राहायचा. दोन दिवसाअगोदर एका मोटारपंप चोरीच्या आरोपातील ३ संशयित चोरांच्या शोधात भिसी पोलीस होते. यातील विनोद हा एक संशयीत आरोपी होता. मात्र, मंगळवारी सकाळच्या सुमारास विनोद माणिक पाटील याच मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. विनोदच्या पश्चात मुकबधिर असलेले आई व वडील आहेत. विनोदच्या अशा अचानक जाण्याने पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती भीसी पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्ह रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही याचा पुढील तपास उप पोलीस निरीक्षक जंगम करीत आहेत.