चंद्रपूर : आज सायंकाळी बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा एक भाग कोसळला ( Footover bridge collapsed ). प्राथमिक माहितीनुसार घटने दरम्यान जवळपास 25 जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Guardian Minister Sudhir Mungantiwar ) यांनी दिले आहेत.
पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश -या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्लारपूर येथील पदाधिकारी रेल्वे स्टेशनवर पोहचून त्यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे आदेश - या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी कळताच जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व जखमींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले.
फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला -चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रविवारी मोठा अपघात ( Footover bridge collapsed at Ballarasha railway station ) झाला. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. या पुलाची उंची सुमारे 60 फूट होती. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी तेथून जात होते. पुलाचा काही भाग तुटल्याने प्रवासी रेल्वे रुळावरून 60 फूट खाली पडले. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी घडली.