चंद्रपूर -जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर येथील राष्ट्रवादीच्या नगर परिषद अध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे यांनी ३ नगरसेवकांसह भाजप प्रवेश केला. तसेच कोरपना तालुक्यातील २५० कार्यकर्त्यांनी देखील सुधीर मुनगंटीवार आणि राजुराचे ज्येष्ठ नेते अरुण म्हस्की यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. राजुरा विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा देखील भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
चंद्रपुरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित - गडचांदूर नगराध्यक्ष भाजप प्रवेश
राजुरा विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा देखील भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकही उमेदवारी दिलेली नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकही उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये पक्षांबद्दल रोष होता. आघाडी पक्षाकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाचा व सद्स्यत्वाचा राजीनामा देत येत्या काही दिवसात भाजप पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सुदर्शन म्हणाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कमळ हातात घेतल्याने भाजपची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.