महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2022, 1:13 PM IST

Updated : Dec 3, 2022, 4:19 PM IST

ETV Bharat / state

ताडोबा प्रकल्पात आणखी चार बछडे आढळले मृतावस्थेत शिवणी वनपरिक्षेत्र येथील घटना

ताडोबाच्या जंगलात वाघाच्या बछड्यांचा मृत्यू होत असल्याने खळबळ माजली आहे. परवाच एक बछडा मृतावस्थेत सापडला होता. आता आणखी 4 बछडे मृतावस्थेत आढळले ( Four Calves Died In Tiger Attack ) आहेत.

ताडोबा प्रकल्पात आणखी चार बछडे आढळले मृतावस्थेत
ताडोबा प्रकल्पात आणखी चार बछडे आढळले मृतावस्थेत

चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात एक बछडा मृतावस्थेत आढळून आला ( Tadoba Andhari Tiger Reserve ) होता. आता याच परिसरात आणखी चार बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिवणी बफर क्षेत्रातील ही घटना आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा वाघांसाठी ओळखला जातो. 1 डिसेंबर रोजी शिवणी बफर क्षेत्रात वाघाचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला होता, याच परिसरात आता आणखी चार बछडे मृतावस्थेत आढळून आले ( Four Calves Died ) आहेत.

ताडोबा प्रकल्पात आणखी चार बछडे आढळले मृतावस्थेत

प्राथमिक अंदाज : वाघ जो प्रजननाच्या काळात येतो तेव्हा तो अत्यंत हिंसक आणि आक्रमक होतो. अशावेळी वाघिणीच्या समागमासाठी तो बछड्यांना मारतो. अशाच घटनेत या बछड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला ( Four Calves Died In Tiger Attack ) होता. अधिक तपासासाठी ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

वाघ आढळून आला :1 डिसेंबरला कर्मचारी गस्तीवर असताना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या शिवनी बफर क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 265 मध्ये तीन ते चार महिन्याचे बछडे आढळून आले होते. 30 नोव्हेंबरला T 75 ही वाघीण कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याने या बचड्यांवर वनविभाग नजर ठेवून होता. 2 डिसेंबरला याच परिसरात एक वाघ आढळून आला होता.

3 डिसेंबरला चार बछडे मृतावस्थेत आढळले :3 डिसेंबरला हे सर्व चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. यापैकी दोन नर तर दोन मादी आहेत. या चारही बचड्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. वाघाच्या हल्ल्यात या बचड्यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले ( Four Calves Died In Tiger Attack ) आहे. याच परिसरात एक वाघीण देखील असल्याने हे बछडे नेमके कोणाचे याचा शोध सुरू आहे. आईची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व बचड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करून परागंदा वाघांच्या हालचालीसाठी टिपण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 3, 2022, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details