चंद्रपूर- सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. अशीच एक घटना मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयात घडली. एक मादी अस्वल ३ पिलांसह दाखल झाल्याने नागरिकात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO : कर्मवीर महाविद्यालयात भरली अस्वलांची शाळा
मादी अस्वल महाविद्यालय परिसरात पिलांसह मुक्त संचार करत होती. चारही अस्वले परिसरात असलेल्या बेलाच्या फळांकडे आकर्षित होत होती.
मादी अस्वल आणि ३ पिल्ले
शहरातील महाविद्यालय परिसरात एकूण ४ अस्वल बघून अनेकजण घाबरले. ही मादी अस्वल महाविद्यालय परिसरात पिलांसह मुक्त संचार करत होती. चारही अस्वले परिसरात असलेल्या बेलाच्या फळांकडे आकर्षित होत होती. अस्वल नागरी वस्तीत घुसू नये यासाठी नागरिकांनी अस्वलांना जंगलाकडे पिटाळून लावले. सध्या जंगलातील अनेक पाण्याचे स्रोत आटले आहेत. अनेक वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करत आहेत.