चंद्रपूर - इंफॅन्ट जिझस संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे तसेच त्यांचे लहान बंधू आणि राजुरा शहराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना विनयभंग केल्या प्रकरणी राजुरा पोलिसांनी सोमवारी रात्री त्यांना अटक केली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून त्यांना बल्लारपुर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे
विनयभंगप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटेंसह नगराध्यक्ष अरुण धोटेंना अटक - चंद्रपूर
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे तसेच त्यांचे लहान बंधू आणि राजुरा शहराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना विनयभंग केल्याप्रकरणी राजुरा पोलिसांनी सोमवारी रात्री त्यांना अटक केली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून त्यांना बल्लारपुर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे
संग्रहीत छायाचित्र
राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात या दोन्ही बंधूंना अटक करण्याची मागणी होत असतानाच विनयभंगाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण दोन वर्षापूर्वीचे आहे. मात्र, काल याबाबत पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली.
Last Updated : May 21, 2019, 12:59 PM IST