चंद्रपूर - चिमूर तालुक्यात रविवारपासून संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. यामुळे शहराजवळील १९५ लोकवस्ती असलेल्या चिखलापार गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढल्याने बेटाचे स्वरूप आले आहे. चिमूरपासून हिंगणघाट, वर्धा, पिपरडा सिंदेवाही, पिपळणेरी भिशी, खडसंग, मुरपार आदी गावाचा संपर्कही तुटला आहे. तसेच चिमूर आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला - चंद्रपूर पाऊस
चिमूर तालुक्यात रविवारपासून संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. तसेच हिंगणघाट, वर्धा, पिपरडा सिंदेवाही, पिपळणेरी भिशी, खडसंग, मुरपार आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच चिमूर आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच सावरगाव येथील दोन तलाव तुडूंब भरले असून, हे तलाव फुटण्याची भिती उप विभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पहाणी करून गावकऱ्यांना चिमूर येथील शेतकरी भवनात हलवले आहे.
दरवर्षीच्या पुराने स्थानिकांसाठी गावांचे रस्ते बंद होतात. याविषयी गावकऱ्यांनी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींपुढे गऱ्हाणे मांडले. परंतु, लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची सोय न केल्याने ऐनवेळी प्रशासनाला या पुरासंदर्भात माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी स्वत: हजर राहून सरपंच व इतर गावकऱ्यांना चिमूर येथील शेतकरी भवनात हलवले. सर्व गावकऱयांची जेवण व औषधांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.