जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई, तीन जणांवर गुन्हा दाखल
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.
चंद्रपूर - जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत तीन दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दोन दुकानदारांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.