चंद्रपूर -बनावट तंबाखू तयार करून मोठ्या ब्रँडचे लेबल लावून विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपूर पोलिसांनी केला आहे. अशाप्रकारच्या कारखान्यावर छापा टाकून 50 लाखांचा बनावट सुगंधित तंबाखु जप्त करण्यात आला. रामनगर ठाणे, गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोजा वलनी ते चेक निंबाळा रोड लगत असलेल्या फॉर्म हाऊसमध्ये
बनावट सुगंधित तंबाखुचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. तिथे छापा टाकला असता बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याचे मोठे घबाड समोर आले. येथे निकृष्ट दर्जाचा तंबाखू घेऊन त्यात अन्य पदार्थांची भेसळ करून मोठ्या ब्रँडच्या लेबलने त्याची पॅकिंग केली जात होती. घटनास्थळाहून शशी प्रेमानंद कांबळे, शैलेश जग्गनाथ पटेल ( मातानगर चौक, लालपेठ चंद्रपुर) आणि मोहम्मद अब्दुल उर्फ शहादाब रौफ शेख (पेपर मिल कॉलनी, बल्लारपूर) यांना अटक करण्यात आली.
मोठे रॅकेट? बनावट तंबाखुच्या कारखान्यावर छापा; 50 लाखांचा मुद्देमाल जप्त - चंद्रपूर पोलीस बातमी
या कारवाईत निकृष्ट दर्जाची तंबाखू, त्यात भेसळ करणारे पदार्थ, मझा, ईगल या कंपनीचे बनावट लेबल, पॅकिंग करणारे मशीन, साहित्य जप्त करण्यात आले. हा मुद्देमाल तब्बल 50 लाखांचा आहे. चंद्रपूर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.
या कारवाईत निकृष्ट दर्जाची तंबाखू, त्यात भेसळ करणारे पदार्थ, मझा, ईगल या कंपनीचे बनावट लेबल, पॅकिंग करणारे मशीन, साहित्य जप्त करण्यात आले. हा मुद्देमाल तब्बल 50 लाखांचा आहे. चंद्रपूर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे, विठल मोरे, मनोहर कामडी, रजिकांत पुट्टावार, संजय चौधरी, सुरेश कसारे, विकास जुमनाके, सतिश अवथरे यांनी ही कारवाई केली.
पटेलचे बनावट तंबाखुचे मोठे रॅकेट?
पकडण्यात आलेला 50 लाखांचा मुद्देमाल हा एकूण या धंद्याच्या व्यापकतेनुसार क्षुल्लक आहे. यात पकडण्यात आलेला शैलेश पटेल हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा बनावट तंबाखूच्या अवैध धंद्यात मोठा दबदबा आहे, अशी माहिती आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गडचांदूरपर्यंत त्याचा हा बनावट माल पुरविला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून तो या व्यवसायात आहे मात्र, पहिल्यांदाच तो एखाद्या कारवाईत अडकला आहे. त्यामुळे जर त्याची चौकशी केल्यास पोलिसांना चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारीच्या नावाने सुरू असलेला अवैध धंदा आणि ते चालविणारे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता आहे.