चंद्रपुर -बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. एक नराधम बाप आपल्या पोटच्या मुलींवर काही दिवसांपासून अत्याचार करीत होता. विशेष म्हणजे हा नराधम बाप माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. नागभीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बाप-मुलीच्या नात्याला काळिमा, पोटच्या मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार - मुली
नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या नराधम पित्याने आपल्या पोटच्या मुलींवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
नराधम बापाकडून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा
आरोपी हा माजी जिल्हा परिषद सदस्य असून तो नवरगाव येथे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पत्नीशी पटत नसल्याने पत्नी तो विभक्त राहत होते. त्याच्या दोन मुली या त्याच्या सोबतच राहत होत्या. त्यातील एक मुलगी १७ वर्षांची तर दुसरी १४ वर्षांची आहे. या दोन्ही मुलींवर हा नराधम बाप काही दिवसांपासून अत्याचार करीत होता. हा अत्याचार असह्य झाल्याने अखेर मुलींनी आपली तब्येत बरी नसल्याने दवाखान्यात जात असल्याचे सांगत घरातून पळ काढला. त्यानंतर थेट आपल्या मामाकडे जाऊन त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. या मुलींना घेऊन मामाने नागभीड पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.