चंद्रपुर -जिल्ह्यातील घुग्घुस येथे एका प्रेमप्रकरणात ऑनर किलिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रियकराची वडील आणि भावाने हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही हत्या सुनियोजितरित्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ऑनर किलिंगने चंद्रपूर हादरले.. मुलीच्या वडील आणि भावाने केली प्रियकराची हत्या - boyfriend
मृत योगेश जाधव आणि प्रभूदास दुर्वे यांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. मागच्या ६ वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, मुलीचे वडील प्रभूदास दुर्वे आणि त्यांचा मुलगा कृष्णा दुर्वे यांना काही दिवसांपूर्वी याचा सुगावा लागला होता. त्यामुळे वडील, भाऊ आणि मृत योगेश जाधव यांच्यात वाद झाला होता. मुलीचा नाद सोडून दे नाही तर तुला जीवानिशी मारून टाकू, अशी धमकीसुद्धा त्यांनी योगेशला दिली होती.
मृत योगेश जाधव आणि प्रभूदास दुर्वे यांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. मागच्या ६ वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, मुलीचे वडील प्रभूदास दुर्वे आणि त्यांचा मुलगा कृष्णा दुर्वे यांना काही दिवसांपूर्वी याचा सुगावा लागला होता. त्यामुळे वडील, भाऊ आणि मृत योगेश जाधव यांच्यात वाद झाला होता. मुलीचा नाद सोडून दे नाही तर तुला जीवानिशी मारून टाकू, अशी धमकीसुद्धा त्यांनी योगेशला दिली होती. तरीही मुलगी वारंवार योगेशला फोन करत होती.
रविवारी मुलगी तिच्या मावशीसोबत असताना तिने फोन करून योगेशला भेटायला बोलावले. योगेश आपल्या दुचाकीने निघाला असताना वाटेतच मुलीचा पुन्हा फोन आला. तिने त्याला तुझी दुचाकी ठेवून दे आणि बसने चारगाव चौकी येथे ये, असे सांगितले. म्हणून योगेशने नायगाव येथे दुचाकी ठेवली आणि बसने चारगाव चौकी गाठले. तो मुलीशी बोलत असतानाच मुलीचे वडील प्रभूदास दुर्वे आणि त्यांचा मुलगा विष्णू दुर्वे यांनी योगेशला गाठले. त्याला पुनवट या गावाजवळ नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत योगेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर योगेशचा मृतदेह निलजई कोळसा खान परिसरात आणून एका झुडुपात फेकून देण्यात आला. ही घटना समोर येताच शिरपूर पोलिसांनी वडील आणि मुलीच्या भावाला अटक केली आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.