चंद्रपूर- तहसीलदारांसमोरच शेतकऱ्यांने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे. किसन सानप, असे शेतकऱ्याचे नाव असून ते शेणगाव येथील रहिवासी आहेत. तहसीलदारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
चंद्रपुरात तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - farmer suicide news
तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे. किसन सानप, असे शेतकऱ्याचे नाव असून ते शेणगाव येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा -कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणून राष्ट्रवादी पक्ष निवडला - अनिल गोटे
किसन सानप यांच्या जमिनीच्या वादाचे प्रकरण जिवती तहसीलमध्ये प्रलंबित आहे. या प्रकरणात तहसीलदार बेडसे हे गैर अर्जदाराची बाजू घेतात, असा आक्षेप सानप यांचा आहे. सानप यांनी सांगितल्यानुसार, तहसीलदार बेडवे हे वारंवार तारखेवर बोलावून पिळवणूक करायचे. कार्यालय संपेपर्यंत बसवून ठेवायचे. जामिनासाठी पैशांची मागणी तहसीलदार करायचे, असा गंभीर आरोप शेतकऱ्याने केला आहे. तहसीलदारांच्या जाचाला कंटाळून अखेर सानप यांनी तहसीलदार बेडसे यांच्यासमोरच कार्यालयात विष घेतले. दरम्यान, सानप यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.