राजुरा (चंद्रपूर) - शेतातील कामे आटोपून बैलांना घेऊन घराकडे येणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 20 जुलै) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. तूळीराम आत्राम, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यात दहशत पसरली आहे.
राजुरा तालुक्यात येणाऱ्या कवीठपेट येथील शेतकरी तुळशीराम आत्राम (वय 68 वर्षे) हे शेतातील कामे आटोपून बैलांना घेऊन घराकडे निघाले होते. कवीटपेठ जवळ असलेल्या नाल्याजवळील झुडूपांत लपलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आत्राम यांना गंभीर दूखापत झाली.
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; राजुरा तालुक्यातील घटना - चंद्रपूर बातमी
राजुरा तालुक्यातील कवीठपेट येथील एका शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला चढविला यात शेतकरी गंभीर झाला असून त्याच्यावर राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; राजुरा तालुक्यातील घटना
घटनेची माहिती मिळताच विरुर वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, वनरक्षक गोवींदा तामेवार यांनी घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी असलेल्या आत्राम यांना उपचारासाठी तत्काळ राजुरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ऐन शेती हंगामात वाघाचे हल्ले वाढल्याने शेतकरी दहशतीत आहेत.
Last Updated : Jul 21, 2020, 10:50 AM IST