महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजुऱ्यात वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी; महिन्याभरातील चौथी घटना

बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जाणाऱ्या शेतमजुरावर वाघाने हल्ला केला. यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. देविदास चंदू तलांडे, असे जखमीचे नाव आहे.

tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

By

Published : Dec 12, 2019, 4:49 PM IST

चंद्रपूर- बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जाणाऱ्या शेतमजुरावर वाघाने हल्ला केला. यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. देविदास चंदू तलांडे, असे जखमीचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात वाघांचा धुमाकूळ सुरूच आहे. अवघ्या महिन्याभरात वाघाने हल्ला केल्याची ही चौथी घटना आहे. आता शेतात वाघ येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण आहे.

हेही वाचा -यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार

मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र विरुर अंतर्गत येणाऱ्या चिचबोडी येथील शंकर मोगाजी धोंगळे यांचे शेत वरुर-विरुर मार्गावर आहे. धोंगळे यांच्याकडे देविदास चंदू तलांडे हे शेतमजुरी करतात. आज(गुरुवार) बैलांना घेऊन तलांडे शेतात गेले होते. दुपारच्या वेळी देविदास तलांडे हे बैलांना पाणी पाजण्यासाठी कक्ष क्र. 168 मध्ये असणाऱ्या नाल्यावर घेऊन जात होते.

दरम्यान, बांबूच्या झाडीमागे लपून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तलांडे गोंधळले. मदतीसाठी ते ओरडू लागले. अशा परिस्थितीत हिंमत एकवटवून हातात असलेल्या कुऱ्हाडीच्या मदतीने तलांडे यांनी वाघाला दूर पळवून लावले. मात्र, यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल एस.एम.कटकू, वनरक्षक पी.एन.जावळे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर जखमीला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details