चंद्रपूर -दहशतवाद हा केवळ मानवाशी निगडित नाही तर तो निसर्गाशीही निगडित आहे. पर्यावरण दहशतवाद हा त्यापैकीच एक. या पर्यावरण दहशतवादामुळे मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा सजीव सृष्टीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल, असे मत पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक योगेश दूधपचारे यांनी व्यक्त केले.
दूधपचारे यांनी जागतिक स्तरावर होत असलेल्या पर्यावरण बदलांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली. दिल्लीमध्ये उच्च तापमानाचा 100 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला त्याच ठिकाणी 119 वर्षांचा सर्वात कमी तापमानाचा विक्रमही मोडीत निघाला. एकाच शहरात हवामानातील हा विरोधाभास अत्यंत गंभीर आणि दखल घेण्यासारखी बाब आहे.