चंद्रपूर- वरोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून ही समस्या त्वरित मार्गी लावावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महावितरणच्या प्रशासनाला देण्यात आला आहे.
वरोरा तालुक्यात विजेचा लपंडाव; शिवसेनेचा महावितरणला अल्टीमेटम
वरोरा आणि भद्रावती तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठीची पूर्वतयारी उन्हाळ्यात केली जाते. मात्र, महावितरण प्रशासनाकडून थातूरमातूर पद्धतीने ही कामे करण्यात आली. त्यामुळे थोडीसी हवा, पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित होतो. तासंतास वीज येत नाही.
वरोरा आणि भद्रावती तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठीची पूर्वतयारी उन्हाळ्यात केली जाते. मात्र, महावितरण प्रशासनाकडून थातूरमातूर पद्धतीने ही कामे करण्यात आली. त्यामुळे थोडीसी हवा, पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित होतो. तासंतास वीज येत नाही. तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे जनतेचे वीज उपकरणेदेखील खराब होत आहेत. या समस्येला घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात मंगळवारी महावितरणचे वरीष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. येत्या 7 दिवसात ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणतर्फे देण्यात आले आहे्. आश्वासनाची पूर्ती न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.