महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: आता लखमापूर गावही पांघरणार उजेड, गावातच होईल मोबाईल चार्ज - लखमापूर वीज जोडणी

चंद्रपूर जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात लखमापूर हे गाव आहे. हे गाव भारी ग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात मोबाईल पोहोचला मात्र, आजही वीज पोहोचलेली नाही. लखमापूर गावची ही शोकांतिका ईटीव्ही भारतने पुढे आणली आणि प्रशासनाला खडबडून जाग आली. लखमापूर गावाला विद्यूत पुरवठा करण्याचा कामाला सुरुवात झाली आहे.

Lakhamapur Village
लखमापूर गाव

By

Published : Feb 14, 2020, 9:09 PM IST

Updated : Feb 14, 2020, 9:38 PM IST

चंद्रपूर - देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरीही जिवती तालुक्यातील लखमापूर हे गाव अंधारातच आहे. गावात मोबाईल पोहोचला मात्र, वीज गेली नाही. मोबाईल चार्ज करण्यासाठी नागरिकांना 3 किलो मीटर अंतर कापावे लागते. गावकऱ्यांनी वीजवितरण विभागाकडे अनेकदा वीज जोडणीची मागणी केली. लखमापूर गावची ही शोकांतिका ईटीव्ही भारतने पुढे आणली आणि प्रशासनाला खडबडून जाग आली.

लखमापूर गाव उजेड पांघरणार

लखमापूर गावाला विद्यूत पुरवठा करण्याचा कामाला सुरुवात झाली आहे. विद्यूत मीटरसाठी दहा अर्ज प्राप्त झाल्याची माहिती महावितरणने दिली. लवकरच लखमापूरला विद्युत पुरवठा सुरू होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. टी. राठोड यांनी दिली.

हेही वाचा -अंधारातील लखमापूरकर म्हणतात... आमच्या नव्या पिढीला तरी प्रकाश मिळावा

चंद्रपूर जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात लखमापूर हे गाव आहे. हे गाव भारी ग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात मोबाईल पोहचला मात्र, आजही वीज पोहचलेली नाही. मोबाईल चार्ज करण्यासाठी लखमापूर गावापासून ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या येरवा गावात जावे लागते. काही वर्षांपूर्वी गावात वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत खांब उभे करण्यात आले होते, त्यानंतर मात्र हे काम ठप्प पडले. कालांतराने हे विद्युत खांब कोलमडून पडले. काही विद्यूत खांबावरील तारा चोरीला गेल्या.

गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे वीज पुरवठा करण्याची मागणी केली. 'आम्ही काळोखात दिवस काढले, किमान आमच्या पुढच्या पिढीला तरी उजेड द्या', अशी कळकळीची विनंती गावकरी करत होते. मात्र प्रशाननाने लखमापूरचा समस्येकडे गंभीरतेने पाहिले नाही.

उजेडासाठी झटणारा तरुण...

मागील एक वर्षापासून अंबुजा सिमेंट फाउंडेशन अंतर्गत लखमापूर गावामध्ये शेतीबद्दल अभिनव उपक्रम सुरू आहेत. यासाठी फाउंडेशनचे जिवती येथील प्रोड्युसर युनिट समन्वयक सुभाष बोबडे आणि प्रक्षेत्र अधिकारी अंबादास कंचकटले हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. सोबतच गावातील मुख्य समस्यांचा अभ्यास करून त्या समस्या कशा सोडवता येतील, यासाठीही ते प्रयत्न करत आहेत. लखमापूर या गावातील मुख्य समस्या वीज पुरवठा ही आहे. मागील एक वर्षापासून महावितरण विभागाकडे पाठपुरावा करून या गावाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी प्रक्षेत्र अधिकारी अंबादास कंचकटले यांनी पुढाकार घेतला.

Last Updated : Feb 14, 2020, 9:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details