महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार अपघातात नायब तहसीलदाराचा मृत्यू - चंद्रपूर अपघात न्यूज

कार अपघातात चंद्रपूर तालुक्याच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Deputy Tehsildar dies in car accident in chandrapur
कार अपघातात नायब तहसीलदाराचा मृत्यू

By

Published : Jun 7, 2020, 10:56 PM IST

चंद्रपूर - कार अपघातात चंद्रपूर तालुक्याच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय भास्करवार असे त्यांचे नाव आहे.

कार अपघातात नायब तहसीलदाराचा मृत्यू

विजय भास्करवार हे मूल मार्गाने चंद्रपूरकडे आपल्या कारने येत होते. मार्गातील चिचपल्लीजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर कार झाडावर आदळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. भास्करवार यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. हा अपघात नेमका कसा घडला हे अजूनही समजू शकले नाही. चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनीही दवाखान्यात जाऊन भेट दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details