महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Laxman Pawar case आयुक्तांच्या माणसांकडून जीवेमारण्याच्या धमक्या; बरेवाईट झाल्यास मोहिते जबाबदार, लक्ष्मण पवार यांचा गंभीर आरोप - Death threats

Laxman Pawar case लक्ष्मण पवार प्रकरणात ( Laxman Pawar case ) चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते ( Municipal Corporation Commissioner Rajesh Mohite ) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मोहिते यांनी त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेऊन फसवणूक केली असा, त्यांचा आरोप आहे.

लक्ष्मण पवार यांचा आरोप
लक्ष्मण पवार यांचा आरोप

By

Published : Sep 18, 2022, 5:39 PM IST

चंद्रपूरलक्ष्मण पवार प्रकरणात ( Laxman Pawar case ) चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते ( Municipal Corporation Commissioner Rajesh Mohite ) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मोहिते यांनी त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेऊन फसवणूक केली असा, त्यांचा आरोप आहे. याच मागणीसाठी त्यांनी आयुक्त यांच्या कॅबिनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता पवार याच मागणीसाठी लातूर येथून चंद्रपूरात आलेले आहेत. यादरम्यान आयुक्त मोहिते यांच्या नावाने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असल्याचा खळबळजनक आरोप पवार यांनी केला आहे. यादरम्यान माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही आयुक्त मोहिते यांची असेल, असा इशाराही पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

काय आहे प्रकरण2016 मध्ये राजेश मोहिते हे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहाय्यक होते. लक्ष्मण पवार यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला अनुदान देण्यासाठी मोहिते पैशांची मागणी केली, असा आरोप पवार यांचा आहे. त्यानुसार यासाठी 14 लाख 70 हजारांची रक्कम देण्याचं ठरलं. त्यानुसार पवार यांनी आश्रमशाळेच्या बांधकामासाठी दहा लाख खर्च केले. यादरम्यान पवार यांनी 10 लाख 70 हजार आणि नंतर 4 लाख रुपये अशी दोन टप्प्यात रक्कम दिली. मात्र प्रत्यक्षात या शाळेला शासनाचे कुठलेही अनुदान मिळाले नाही. यानंतर पवार यांनी अनेकदा प्रयत्न केले. तेव्हा त्यांनाकुठे टप्याटप्याने 6 लाख मिळाले. 8 लाख आणखी द्यायचे होते. यादरम्यान मोहिते यांनी 2 मे 2022 ला पवार यांच्याकडून कागदोपत्री करार करून घेतला. त्यात यापुढे आपण राजेश मोहिते यांना कुठलाही मानसिक त्रास देणार नाही, आणि आपली तक्रार आपण मागे घेत असल्याचे हमीपत्र पवार यांना द्यावे लागले.

लक्ष्मण पवार यांचा गंभीर आरोप

यादरम्यान मनपा आयुक्त मोहिते यांनी लक्ष्मण पवार यांना एका खासगी कंपनीत सेवक म्हणून कायमस्वरूपी नोकरी आणि पवार यांच्या दिव्यांग मुलाच्या ऑपरेशनचा सर्व खर्च उचलण्याची तोंडी हमी दिली होती. मात्र, यानंतर मोहिते यांनी कुठलाही प्रतिसाद देणे बंद केले. यानंतर कंटाळून 19 ऑगस्टला पवार यांनी आयुक्त मोहिते यांच्या कॅबिनमध्ये जाऊन स्वतःवर चाकू हल्ला करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात ते जखमी झाले, त्याला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी पवार यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि पुन्हा परत येऊ नको, म्हणून जिल्ह्याबाहेर सोडून आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सामंजस्याने उपोषणाला स्थगितीमात्र पवार हे पुन्हा चंद्रपुरात परतले, त्यांनी आमरण उपोषणाची परवानगी पोलीसांकडून मिळवली. मात्र जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे परवानगी मागण्यासाठी गेले, आता त्यांनी काही दिवस आपण प्रतीक्षा करा. यातून काहीतरी मार्ग निघेल, असा आशावाद दिला. जिल्हाधिकारी यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत तूर्तास पवार यांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास ते उपोषणावर ठाम आहेत.

आयुक्तांच्या माणसांकडून धमकीपवार यांनी आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Forest Minister Sudhir Mungantiwar ) यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. यावेळी मुनगंटीवार यांनी याबाबत चौकशी करण्यासाठीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा सूचना स्वीय सहाय्यकांना केल्या आहेत. यावेळी ते गोलबाजारातून परत येत असताना अचानक एक दुचाकी येऊन थांबली. त्यावर दोन जण स्वार होते. आणि त्यांनी तु आयुक्त मोहिते साहेबांना का त्रास देत आहेस. तुला चंद्रपुरात राहायचं आहे की नाही, नाही तर तुझे जीवन आम्ही मुश्किल करू, अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details