चंद्रपूर - ब्रम्हपुरी तालुक्याच्या टोकावर वसलेले चिंचोली - वडसा पुलीया जवळ नदीपात्रात काल दुपारी अकरा वाजता एका शेतकऱ्याला तरूण युवकाचा मृतदेह आढळून आला. यांची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले.
नदिपात्रात आढळला मृतदेह, लोकेशच्या मुत्युने परिसरात हळहळ - चंद्रपूर बातमी
चिंचोली - वडसा पुलीया जवळ नदीपात्रात काल दुपारी अकरा वाजता एका शेतकऱ्याला तरूण युवकाचा मृतदेह आढळून आला. मृत युवकांची ओळख लोकेश रामेश्वर गजभिये अशी आहे.
नदिपात्रात आढळला मृतदेह
मृत युवकांची ओळख लोकेश रामेश्वर गजभिये (रा. विर्शी हेटी ता. वडसा जि. गडचिरोली) असे आहे. प्राप्त माहितीनुसार लोकेश हा मुल येथे टाईल्सचे काम करून मजुरी करत होता. काही दिवसापूर्वी तो गावी आला. पण त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अद्यापही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. लोकेशच्या परिवारात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. लोकेशच्या मुत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.