राजूरा (चंद्रपूर)- दीड महिन्यापासून सीसीआय मार्फत बंद असलेली कापसाची खरेदी परत एकदा सुरु झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सीसीआयने खबरदारी घेतली आहे. कापसाच्या गाड्या निर्जंतूकरण केल्यावरच कापसाची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकरी, वाहन चालक यांची स्कॅनरव्दारे तपासणी सुरू आहे. कोरपना तालुक्यातील पाच जिनिंगवर कापूस खरेदी सुरु झाली आहे.
कापसाचा गाड्या निर्जंतूक केल्यावरच कापसाची खरेदी; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिनिंगमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या कापसांच्या गाड्यांवर प्रथम सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. शेतकरी, वाहन चालक यांची स्कॅनर मशीनने तपासणी केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिनिंगमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या कापसांच्या गाड्यांवर प्रथम सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. शेतकरी, वाहन चालक यांची स्कॅनर मशीनने तपासणी केली जात आहे. तपासणी नंतरच जिनिंगमध्ये कापसाच्या गाड्यांना प्रवेश दिला जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना दिल्या जात आहेत.
कोरपना तालुक्यात सीसीआय मार्फत कापूस खरेदी बंद होती. शेतकऱ्यांच्या मागणी नंतर दीड महिन्यानंतर कापूस खरेदीला सूरुवात झाली आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा रांगा जिनिंग समोर लागल्या आहेत. तालूक्यात एकूण आठ जिनिंग आहेत त्यापैकी पाच जिनिंग मध्ये कापसाची खरेदी सुरू आहे.