चंद्रपूर - कोरोना संशयित म्हणून आणखी चार रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन रुग्ण हे सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील तर एक रुग्ण शहरातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाचे चार संशयित रुग्णालयात दाखल - corona update maharashtra
संशयित म्हणून आणखी चार रुग्णांना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन रुग्ण हे सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील तर एक रुग्ण शहरातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण राज्यातच हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. यापूर्वी दुबईहून आलेले एक दाम्पत्य संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाले होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर आज आणखी चार संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. यातील शहरातील एक रुग्ण दुबई तर तीन रुग्ण हे नवरगाव येथील एकाच कुटुंबातील असूनस, ते सगळे हज यात्रा करून परत आल्याची माहीती समोर आली आहे. या सर्वांना विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असून त्याचा अहवाल सोमवारी मिळणार आहे.