चंद्रपूर - जिल्ह्यात आज (सोमवार) 265 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 371 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 153 इतकी झाली आहे. सध्या 2778 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 82 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 50 हजार 116 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आज (सोमवार) मृत झालेल्यामध्ये सरदार पटेल वार्ड वरोरा येथील 35 वर्ष पुरुष, ब्रह्मपुरी येथील 34 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 77 वर्षीय व 66 वर्ष पुरुष तसेच बल्लारपूर येथील 82 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 440 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 400, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधितांचा समावेश आहे. तर आज (सोमवार) बाधित आलेल्या 265 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 92, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर 9, भद्रावती 3, ब्रम्हपुरी10, सिंदेवाही 3, मूल 10, सावली 7, राजूरा 7, चिमूर 35, वरोरा 52, कोरपना 15, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यात आढळत आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ - कोरोना रुग्णसंख्येत वाढ
जिल्ह्यात आतापर्यंत 440 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 400, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधितांचा समावेश आहे. तर आज (सोमवार) बाधित आलेल्या 265 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 92, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर 9, भद्रावती 3, ब्रम्हपुरी10, सिंदेवाही 3, मूल 10, सावली 7, राजूरा 7, चिमूर 35, वरोरा 52, कोरपना 15, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 4 रुग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूर कोरोना