महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावात कोरोनाची...शेतात वाघोबाची भीती - CHANDRAPUR NEWS

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या हिवरा गावालगत वाघ दिसून येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावापासून जवळच असलेल्या विलास कुत्तमारे यांचा शेतात वाघाचे पगमार्ग आढळून आले. किरमीरी मार्गावरही अनेक ठिकाणी पगमार्ग आहेत.

tiger
गावात कोरोनाची...शेतात वाघोबाची भीती

By

Published : Mar 30, 2020, 3:13 PM IST

चंद्रपूर -कोरोनाच्या भीतीच्या सावटात गावे हादरली आहेत. घराच्या बाहेर जाणे गावकऱ्यांनी टाळले आहे. अशात उभी असलेली पिके बघण्यासाठी बळीराजाचे शेतात ये-जा सुरू आहे. मात्र, शेतात वाघोबाचे पगमार्ग आढळून आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गावात कोरोनाची तर शेतात वाघोबाची भीती निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे देश टाळेबंद झाला आहे. गावखेड्यातही कोरोनाची भीती दिसून येत आहे. आता या भीतीत वाघोबाने भर घातली आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या हिवरा गावालगत वाघ दिसून येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावापासून जवळच असलेल्या विलास कुत्तमारे यांचा शेतात वाघाचे पगमार्ग आढळून आले. किरमीरी मार्गावरही अनेक ठिकाणी पगमार्ग आहेत. शेतात ये जा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना वाघोबाने दर्शन दिले. कोरोनाच्या सावटात गावकऱ्यांनी कुलूप बंद केले. मात्र, शेतात उभे असलेली पिकं बघायला बळीराजाचे शेतात ये जा सुरू आहे. अशात वाघोबाने शेतशिवारात आसरा घेतल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

गावकऱ्यांनी वनविभागाला पगमार्गाची माहिती दिली आहे. वनरक्षक धनराज रायपुरे,गोविंदा गेडाम यांनी पगमार्गाची पाहणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details