महाराष्ट्र

maharashtra

महागाईविरोधात महिला काँग्रेस आक्रमक, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरमध्ये आंदोलन

देशातील जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. या सर्व महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन पुकारले आहे. आज चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

By

Published : Jul 9, 2021, 7:04 PM IST

Published : Jul 9, 2021, 7:04 PM IST

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरमध्ये काँग्रेसचे आंदोलन
आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपुरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

चंद्रपूर - मोदी सरकारच्या मागील ७ वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

चंद्रपुरमध्ये महागाई विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर

'शेजारच्या देशात पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने'

उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०४ रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे.

'सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले'

सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतला आहे. या जुलमी, अत्याचारी सरकारचा विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, महिला ग्रामीण अध्यक्ष चित्रा डांगे, महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, नगरसेविका सुनीता लोढीया, स्वाती त्रिवेदी, मीनाक्षी गुजरकर, लता बारापात्रे, शीतल कातकर, वाणी दरला, हर्षा चांदेकर, सुनीता धोटे, बोर्डा सरपंच यशोदा खामनकर, वरोरा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्नमाला अहिरकर यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details