चंद्रपूर : पुरजन्य परिस्थितीमुळे ( Chandrapur Flood Situation ) मोठी जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. याबाबत त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे, यावर तत्काळ निर्णय घेऊन मदत केली जाणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी दिले. आज ते चिमूर येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी हे प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे होते.
हेही वाचा -OBC Reservation : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय
फडणवीस चिमूर दौऱ्यावर -चिमूर तालुक्याला याचा सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर दौऱ्यावर येणार होते. भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांचा हा मतदारसंघ आहे. सध्या पूर ओसरला असला तरी याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या भागाची पाहणी केली. याबाबत लवकरच निर्णय घेऊन पूरपीडितांना मदत केली जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
जिल्ह्यातील पूरस्थिती ( MH Chandrapur Flood Situation) पूर्ववत होत असतानाच मागील चोवीस तासात मुसळधार पावसाची (Heavy Rains) नोंद झाल्याने, पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील मूल, सावली येथे अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. चिमूर शहरासह तालुक्यातील अनेक गावाला पुराने वेढले असून बचाव कार्य सुरू आहे. सध्या तालुक्यातील स्थिती सामान्य होत असली तरी पुढील चोवीस तास धोक्याचे असणार आहे. इरई धरणाचे (Erai Dam) सातही दारं दीड मीटरने उघडण्यात आले आहे. तसेच निम्न वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सोबत नजीकच्या तेलंगणा राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जर पुढील चोवीस तासांत मुसळधार पाऊस कोसळला तर याचा मोठा फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसणार आहे.