चंद्रपूर - वंचित बहुजन आघाडीचा चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार आज (मंगळवार) घोषित करण्यात आला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चांदा येथील क्लब मैदानावर आयोजित वंचित समाज राजकीय हक्क एल्गार परिषदेत चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी अॅड. राजेंद्र महाडोळे यांची उमेदवारी घोषित केली.
ते पुढे म्हणाले, राजकीय सत्तेसाठी काँग्रेसने नेहमीच बहुजन समाजाचा वापर करून घेतला. तोच कित्ता भाजप सरकार गिरवत आहे. भाजपनेही गेल्या साडेचार वर्षांत बहुजन समाजाची दिशाभूल करून सत्तेसाठी वापर करून घेतल्याची टीका आंबेडकर यांनी केली. यावेळी कार्यक्रमाला अॅड. राजेंद्र आंबेडकर, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, माजी मंत्री रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, संजय हेडाऊ, जयदीप खोब्रागडे, रामराव चव्हाण, राजेंद्र घाटे, नाना लोखंडे, अमोल गुरुनुले, प्रवीण पेटकर, डी.के.बापू माळी, नानाजी आदे, मनोज अंबाडकर, प्रा. नान्हे, प्रा. कोहळे, शकील पटेल, इरफान शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, आमचा धर्माला विरोध नाही, मात्र राजकीय पक्षाला धर्म असावा, हे आम्ही मानत नाही. मात्र, अलीकडे राजकीय धर्माच्या नावावर राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे जनतेनी आता सावध होण्याची वेळ आली आली. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्थापितांनी धसका घेतला आहे.