महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा ; संध्या गुरनुले अध्यक्षा तर उपाध्यक्षपदावर रेखा कोरेकर - अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. परिषदेच्या अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कोरेकर यांची निवड झाली.

Chandrapur Zilla Parishad Election
चंद्रपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा

By

Published : Jan 4, 2020, 8:34 PM IST

चंद्रपूर -जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. ज्येष्ठ सदस्य संध्या गुरनुले यांची अध्यक्षा म्हणून तर रेखा कारेकर यांची उपाध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. गुरनुले यांनी काँग्रेसच्या वैशाली शेरके यांचा तर रेखा कारेकर यांनी खेमराज मरसकोल्हे यांचा ३६ विरूध्द २० अशा मत फरकाने पराभव केला.

चंद्रपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा...

हेही वाचा... 'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'

चंद्रपूर जिल्हा परिषदेत एकूण 56 सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे 36 एवढे संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होईल, हे जवळपास निश्चित होते. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक एकतर्फी होण्यासाठी काळजी घेतली. त्यामुळे काँग्रेसला फोडाफोडीच्या प्रयत्नात अपयश आले.

हेही वाचा... नाशिकहून गंगासागरला जाणारी भाविकांची बस पलटली; अपघातात एकाचा मृत्यू तर, 26 जण जखमी

संध्या गुरनुले या दुसऱ्यांदा या पदावर विराजमान झाल्या. यावेळी हे पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुधीर मुनगंटीवार यांनीही जिल्हा परिषदेत पोहोचून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच जनसेवेचे आश्वासन दिले. तर, नवनिर्वाचित अध्यक्षा संध्या गुरनुले यांनीही पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details