चंद्रपूर - वारंवार विनंती, आवाहन करूनही काहींचे विनाकारण घराबाहेर निघणे सुरुच आहे. अशा लोकांवर चंद्रपूर पोलिसांनी कारवाई करत 'कोरोना किंग' घोषित केले. एवढेच नाही तर, अशा लोकांचा हार आणि टीका लावून सत्कार करण्यातदेखील करण्यात आला. या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांचा कारवाई सोबत सत्कार, हार घालून घोषित केले 'कोरोना किंग' - lock down effect
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर चंद्रपूर पोलिसांनी कारवाईची नवी युक्ती शोधली आहे. यात रस्त्यावंर फिरणाऱ्यांच्या गळ्यात हार टाकून आणि टिका लावून त्यांना 'कोरोना किंग' म्हणत सत्कार करण्यात येत आहे. "आपण कोरोनाच्या काळात बाहेर पडलात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, म्हणून आपला सत्कार करण्यात येत असल्याचे" सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात 21 दिवसांची संचारबंदी घोषित करण्यात आली. आता ही संचारबंदी आणखी दोन आठवडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि तातडीच्या सेवांसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा असताना काही लोक कुठलेही निमित्त, कारण नसताना जिल्ह्यात मुक्तसंचार करताना दिसत आहे. यावर अनेक आवाहने केल्यावरही काही लोकांवर याचा परिणाम झालेला नाही. अशा लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा चंद्रपूर पोलिसांनी लावला आहे.
जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत अशांवर संचारबंदीची कारवाई करण्यात येत आहे. सोबत त्यांच्या गळ्यात हार टाकून आणि टिका लावून त्यांना 'कोरोना किंग' म्हणत त्यांचा सत्कारही करण्यात येत आहे. "आपण कोरोनाच्या काळात बाहेर पडलात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, म्हणून आपला सत्कार करण्यात येत असल्याचे" सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून सध्या चंद्रपूर पोलिसांच्या या युक्तीची परिसरात चर्चा होत आहे.