महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमची कैफियत कुणापुढे मांडायची?; चंद्रपुरातील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल - chandrapur latest news

उभ्या पिकातील सोयाबीनला शेंगा उगवल्या, कापलेले सोयाबीन सडले, कापसाला बोंड आले नाही, आले तेही झडले, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी दिवाळी पूर्वी पिके निघत होती, यावेळी मात्र मोठा फटका बसला आहे.

पिक नुकसान

By

Published : Nov 4, 2019, 5:09 PM IST

चंद्रपूर - पावसाळ्याच्या सुरुवातीला उशिरा झालेल्या पावसाने पेरण्या लांबल्या. त्यांनतर कापूस, सोयाबीन आणि धानाची (भात) पेरणी व लागवड करण्यात आली. मात्र, या वर्षीच्या सततच्या पावसाने शेतकऱ्यास रडकुंडीस आणले आहे. त्यात परतीच्या पावसाने हाती येणारे उत्पन्नही हिसकावले. यामध्ये आलेली निवडणूक आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी लागलेली रस्सीखेच, यामुळे आमची कैफियत कुणापुढे मांडायची? असा गंभीर सवाल ओला दुष्काळग्रस्त शेतकरी करीत आहे.

चंद्रपुरातील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

हेही वाचा-शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर

चालू वर्षात चांगला पाऊस पडणार असल्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने जवळची पदरमोड, सोनं गहान ठेवत तसेच बँक व सावकारी कर्ज घेऊन पेरणी, मशागत केली. आता चांगले उत्पन्न मिळून कर्ज फेडणे शक्य होईल, अशी आशा होती. मात्र, या वर्षीच्या सततच्या रिपरिप पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले.

हेही वाचा-मुंबई- पुणे महामार्गावरील बोरघाटात बस दरीत कोसळली, ५ ठार, ३० जखमी

उभ्या पिकातील सोयाबीनला शेंगा उगवल्या, कापलेले सोयाबीन सडले, कापसाला बोंड आले नाही, आले तेही झडले, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी दिवाळी पूर्वी पिके निघत होती, यावेळी मात्र मोठा फटका बसला आहे. या वर्षीच्या दिवाळीवर पूर्णता पावसाचे सावट असल्याने आणि हातात पैसा नसल्याने दिवाळी थंडी झाली. दिवाळीनंतर दोन महिन्यात पिकं निघतीलही पण उत्पनात कमालीची घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. निवडणुकीमुळे राजकारण्यांची दिवाळी आंनदात झाली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी सुरू असलेली रस्सीखेच, यामुळे नुकसान भरपाई कोण देणार? कोणापुढे आपली कैफियत मांडायची, असा गंभीर सवाल खडसंगी येथील ओला दुष्काळ ग्रस्त शेतकरी करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details