महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Central Team Inspection in Chandrapur : पूरग्रस्त गावांच्या पाहणीकरिता केंद्रीय पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल; नऊ गावांची केली पाहणी - नुकसानग्रस्त शेतजमीन

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ( Due to Heavy Rains ) चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती ( Flood Situation in Chandrapur ) निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक गावे बाधित होऊन शेतीसह घरांचे, शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक ( Central Team ) चंद्रपूर जिल्ह्यात दाखल ( Central Team Entered in Chandrapur ) झाले आहे. केंद्रीय पथकाच्या ( Economic Adviser Rajeev Sharma ) चमूने नुकसानग्रस्त नऊ गावांची ( Nine Villages were Inspected ) पाहणी केली. नुकसानग्रस्त झालेली शेतजमीन ( Damaged Agricultural ), पडलेली घरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आदींची पाहणी केली. तसेच, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Flood Situation in Chandrapur
चंद्रपूरमधील पूरपरिस्थिती

By

Published : Aug 4, 2022, 7:14 AM IST

Updated : Aug 4, 2022, 7:58 AM IST

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ( Due to Heavy Rains ) अनेक तालुक्यांना पुराचा ( Flood Situation in Chandrapur ) जबर फटका ( Chandrapur Hit Hard by Floods ) बसला. या पूरग्रस्त गावांची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक ( Central Team ) आज (बुधवारी) जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने भद्रावती तालुक्यातील ( Bhadravati Taluka ) चारगाव, देऊळवाडा, माजरी, पळसगाव, पाटाळा, मनगाव, तर वरोरा तालुक्यातील करंजी, सोईत, दिधोरा या नऊ गावांना भेटी देऊन ( Varora Taluka ) नुकसानग्रस्त झालेली शेतजमीन, पडलेली घरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आदींची पाहणी केली. तसेच, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

चंद्रपूरमधील पूरपरिस्थिती

केंद्रीय पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित : या केंद्रीय पथकामध्ये ( Central Team ) गृह विभागाचे संयुक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार राजीव शर्मा ( Economic Adviser Rajeev Sharma of Home Department ), केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे देखरेख संचालक हरीश उंबर्जे, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे साहाय्यक संचालक मीना हुड्डा आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिकचंद्र पंडित यांचा समावेश होता. तसेच, त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, सा. बां. विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

बाधित गावांची पाहणी : केंद्रीय पथकाने दौऱ्याची सुरुवात चारगाव येथून केली. यावेळी त्यांनी बाधित गावातील नुकसानग्रस्त शेतजमीन, सततच्या पावसामुळे नागरिकांची पडलेली घरे तसेच घरांचे झालेले नुकसान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पोलिस स्टेशन, सभागृह, नदीनाल्यांच्या प्रवाहाचे पाणी गावात येण्याचा मार्ग, नुकसानग्रस्त रस्ते आदींची पाहणी केली.

गावातील नागरिकांनी मांडल्या समस्या : यावेळी सर्वच गावातील नागरिकांनी आपल्या समस्या पथकासमोर मांडल्या. तसेच पूरपरिस्थितीची आपबिती सांगितली. सततच्या पावसामुळे आमच्या शेतीचे 100 टक्के नुकसान झाले आहे. खरिपासाठी बँकेचे घेतलेले कर्ज सरकारने माफ करावे. तसेच, दुबार पेरणीकरिता त्वरित कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश द्यावे. बहुतांश गावातील नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण आवश्यक आहे. तसेच, वेकोलीच्या ओव्हरबर्डनमुळेसुद्धा गावात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या
गावकऱ्यांनी केल्या.

जिल्हाधिकारींनी दिले आदेश : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले की, सर्व नुकसानग्रस्त गावातील शेतीचे आणि घरांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. तसेच, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत 50 हजार रुपये कर्ज बँकांनी उपलब्ध करून द्यावे. पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता वेगळ्या याद्या तयार करून तसेच पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान, पूरपीडितांना नुकसानभरपाई मिळण्यासाठीदेखील शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित : सदर पथकासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, संग्राम शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, प्रभारी जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपुरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांच्यासह तालुका यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. या पथकातील अधिकाऱ्यांनी पिकांचे नुकसान, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान तसेच जीवितहानीची माहिती घेतली. या पथकाने काल सिरोंचा तालुक्यातल्या गावांची पाहणी केली होती.

हेही वाचा :Cabinet Expansion Date : अखेर शिंदे सरकारला मिळाला मुहूर्त; 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार

Last Updated : Aug 4, 2022, 7:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details