चंद्रपूर- धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यावर हात उगारल्या प्रकरणी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारिवाल कंपनीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येत असून या कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष हे आक्रमक झाले होते.
अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी किशोर जोरगेवार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - young chanda brigade
धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यावर हात उगारल्या प्रकरणी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारिवाल कंपनीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येत असून या कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष हे आक्रमक झाले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी रिवाल कंपनीवर मोर्चाही काढला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. अखेर ह्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रवींद्र माने, धारिवाल कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे, व्यवस्थापक संदीप मुखर्जी व किशोर जोरगेवार आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या चर्चेदरम्यान यंग चंदा ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झालेव त्यापैकी एकाने थेट कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे यांच्या कानशिलात लगावली.
हा सर्व प्रकार तहसीलदार माने यांच्यासमोर घडला. विशेष म्हणजे घटनास्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होते. जोरगेवार यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा पुढील अनर्थ टळला. या प्रकरणात शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस ठाण्यात किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात भादंवी कलम 323, 352, 504, 506 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.