चिमूर (चंद्रपूर)- चिमूर नगरपरिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वडाळा (पैकु) येथील चिमूर कॉम्पा मार्गावरील पिसे पेट्रोल पंपामागील रामभाऊ अगडे यांच्या शेतातील बोळीत पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यु झाला. सोहेल गिरीधर चौधरी असे मृत मुलाचे नाव आहे.
शेतातील बोळीत बुडून मुलाचा मृत्यू, वडाळा येथील घटना - चिमूर बातमी
सोहेल गिरीधर चौधरी असे मृत मुलाचे नाव आहे.
वडाळा (पैकु) येथील गिरीधर चौधरी व त्यांची पत्नी कामावर गेले असताना, त्यांचा मुलगा सोहेल आपल्या तीन मित्रांसोबत पिसे पेट्रोल पंपामागे असलेल्या रामभाऊ अगडे यांच्या शेतात असलेल्या बोळीत पोहायला गेले होते. सोहेल बोळीतल्या चिखलात फसल्याने बुडाला. त्यामुळे त्याचे मित्र घाबरून घराकडे येऊन सोहेल बुडाल्याची माहिती दिली.
त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि सोहेलला बोळीतून बाहेर काढले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले. लहान मुलाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत.