महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात धानोरकर समर्थकांकडून भाजप आमदार श्यामकुळेंचा जाहीर सत्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - खासदार बाळू धानोरकर

श्यामकुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून सलग दोन वेळा विजयी झाले आहे. लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांनी श्यामकुळे यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, अनपेक्षीतरित्या काँग्रेसला तब्बल २५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले. त्यामुळे अहीर आणि श्यामकुळेंनाही धक्का बसला होता.

आमदार नाना श्यामकुळे यांचा सत्कार करताना धानोरकर समर्थक

By

Published : Jun 28, 2019, 12:30 PM IST

चंद्रपूर- शहरात आयोजित एका कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांकडून भाजप आमदार नाना श्यामकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीत श्यामकुळेंच्याच विधानसभा मतदारसंघात गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

श्यामकुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून सलग दोन वेळा विजयी झाले आहे. तसेच ते भाजपचे महानगर अध्यक्षही आहेत. लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांनी श्यामकुळे यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, अनपेक्षीतरित्या काँग्रेसला तब्बल २५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले. त्यामुळे अहीर आणि श्यामकुळेंनाही धक्का बसला होता. मात्र, आता श्यामकुळे 'डॅमेज कंट्रोल' करण्याच्या तयारीला लागले आहेत. याचीच प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आली.

डॉ. सुधाकर अडबाले मित्र परिवार संस्थेच्यावतीने २३ तारखेला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी मासांहारी तसेच शाकाहारी भोजनावळी उठल्या. याच कार्यक्रमात बंडू धोतरे आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार श्यामकुळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचाही सत्कार केला. मात्र, सत्कार करणारे विदर्भ शिक्षक माध्यमिक संघाचे सुधारकर अडबाले, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरूषोत्तम सातपुते, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.चेतन खुटेमाटे हे सर्व धानोरकर समर्थक आहेत. त्यांनी बाळू धानोरकरांचा प्रचार देखील केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच हंसराज अहीर यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित अनेक मान्यवरांनी धानोरकर यांचा उघडपणे प्रचार केला होता. सोबतच भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे काही निवडक लोकांनाच या कार्यक्रमासाठी बोलवले होते. त्यामुळे नव्या राजकीय समिकरणाच्या चर्चेला पेव फुटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details